NIFTY मध्ये मोठी घसरण

 निफ्टी हा आता आठ महिन्याच्या निचांकावरती आहे 22800 ही लेवल सात वेळेला निफ्टी ने होल्ड केली बट फायनली फ्रायडेला 22800 ही लेवल तुटली तर शुक्रवारी असं नक्की घडलं तरी काय हे सगळं अतिशय डिटेल मध्ये पण अतिशय सोप्या भाषेत आपण शिकून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो नाही ना मार्केटच मजेत नाही तुम्ही कसे मजेत असणार आहे काय घडतंय माहिती आहे का निफ्टी आता एक नवीन रेकॉर्ड बनवते चांगला रेकॉर्ड नाही वाईट रेकॉर्ड बनवते हे रेकॉर्ड काय माहिती आहे का की पाच महिने बॅक टू बॅक लाल मध्ये जर मार्केट बंद झालं तर 28 वर्षांनंतर असं काहीतरी घडणार आहे तुम्ही म्हणाल की मार्केट लाल मध्ये बंद होतंय म्हणजे नक्की काय होतंय आता जर तुम्ही माझी आता स्क्रीन बघितली तर मी इकडनं थोडसं झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे अजून छान लक्षात येईल काही ड्रॉइंग्स डिलीट करते करेक्ट आता जर तुम्ही बघितलं तर हे बघा ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी चालू आहे शेवट अगदी तीन चार दिवस राहिलेले आहेत तर जर ही फेब्रुवारीची कॅन्डल सुद्धा जर लाल मध्ये बंद झाली तर हे कधी घडणार आहे 28 वर्षांनंतर असं काहीतरी घडणार आहे सो ही चांगली गोष्ट तर नक्की नाहीच आहे त्याच्यात काहीच दुमत नाहीये पण मग ह्याच्या आधी घडलं कधी होतं तर याच्या आधी या या इन्स्टन्सेसच्या वेळेला हे सगळं घडलं होतं म्हणजे तुम्ही बघितलं तर 94 95 मध्ये सप्टेंबर ते एप्रिल बॅक टू बॅक आठ महिने निफ्टी लाल मध्ये बंद झाला होता आणि तेव्हा 31 जवळ जवळ 35% निफ्टी पडला होता जुलै ते नोव्हेंबर 96 पाच महिने बॅक टू बॅक बॅक निफ्टी पडला होता आणि 26% निफ्टी पडला होता हेच घडलं 91 मध्ये 98 मध्ये आणि 2001 मध्ये जेव्हा चार महिने बॅक टू बॅक निफ्टी पडला होता आणि तेव्हाचे फॉल्स साडे 28% साडे 26% आणि ऑलमोस्ट 22% एवढे होते आता जर तुम्ही बघितलं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी सुद्धा म्हणजे फेब्रुवारीचा स्टार मार्क का दिलाय जर घडलं तर फेब्रुवारी सुद्धा जर क्लोज मध्ये बंद झालं तर ईटीच्या आर्टिकल प्रमाणे जवळ जवळ 12% फॉल आहे बट आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते हा 14% पेक्षा जास्तीचा फॉल आहे सो वाईट गोष्ट काय माहिती आहे का हे चांगलं रेकॉर्ड नाही बनत आहे हे वाईट गोष्ट पण वाईटात चांगलं काय घडतंय की हे फॉल बघा ना 31% 26 28 26 जवळ जवळ 22% आणि आत्ताशी आपण 14% वरती आहोत याचा अर्थ असा नाही की अजून खूप पडू याचा अर्थ असा की आत्ता मार्केटमध्ये आधीच्या तुलनेमध्ये जास्ती ताकद आहे ओके आता आपण म्हणू की ठीक आहे आपल्या मार्केटमध्ये ताकद आहे इनफॅक्ट बरेच जण हे पण म्हणत होते की अमेरिकन मार्केटमध्ये पण खूप ताकद होती अहो इनफॅक्ट जेव्हा त्यांचा आता q4 म्हणजे त्यांचा क्यू फोर जसं आपल्याकडे एप्रिल ते असतं ना तसं अमेरिकेत जानेवारी ते डिसेंबर असाच इयर पकडतात ते सो ऑक्टोबर ते डिसेंबरच जेव्हा त्यांचे रिझल्ट आले तेव्हा सगळे म्हणत होते काय मस्त अर्निंग आलेत अमेरिकन कंपन्यांचे मस्त अर्निंग आहे मस्त प्रॉफिट ग्रोथ आहे विक्री आकडे भारी आलेले आहेत इनफॅक्ट हे न्यूज आर्टिकल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की युएस फोर्थ क्वार्टर 2024 अर्निंग ग्रोथ सेट टू बी द हायएस्ट इन थ्री इयर्स हे कौतुक करतात अच्छा हे कधीच आर्टिकल आहे 13 फेब्रुवारीचा तर आर्टिकल आहे मग आत्ता आत्ता सगळे म्हणत होते वा काय क्या भारी क्या क्या भारी नाही क्या बात है लय भारी आणि क्या बात है मिक्स होऊन क्या भारी असं काहीतरी झालं ठीक आहे असो एवढंच नव्हे तर 19 फेब्रुवारी आत्ता बुधवारी मागच्या बुधवारी अमेरिकाचे अमेरिकेचा जो इंडेक्स आहे एसएनपी 500 जसा आपला निफ्टी आहे तसा त्यांचा एसएनपी 500 आहे त्यांनी ऑल टाइम हाय हिट केलं ऑल टाइम हाय आता 19 फेब्रुवारीला हिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं घडलं तरी काय की फ्रायडेला सगळे म्हणायला लागले अमेरिकन कंपनीज मध्ये काही ताकद नाहीये ओव्हरऑल सगळ्या आता नेगेटिव्ह गोष्टी जास्ती बोलायला लागले युएस मार्केट्स बद्दल तर हे असं घडलं तरी नक्की काय हे आपण लगेचच्या पुढच्या भागात बघून घेणार आहे आता मी म्हणल्याप्रमाणे शुक्रवारी एक रिपोर्ट आला कोणाचा रिपोर्ट आला माहिती आहे एसएन पी ग्लोबल नावाच्या संस्थेने एक रिपोर्ट दिला आणि कदाचित तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं पण असेल की त्याच्यात फार निराशावादी काही वाक्य होती आणि त्याच्यामुळे मार्केट कोसळलं आता ते असं असतं बघा जाहिरातींमध्ये की साधारण टिकिया आणि अमुक अमुक टिकिया तसं आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर्स आणि इतर लोकं असा फरक दिसला पाहिजे ना इतर लोक काय म्हणणार ह्या अमेरिकेत आता काय खरं नाही आपल्या चॅनलचे लोक काय म्हणणार आहेत आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर काय म्हणणार आहेत आम्ही स्वतः तो रिपोर्ट बघितलाय जो एसएनपी ग्लोबल नी पब्लिश केलेला आहे तो आणि त्या रिपोर्ट मध्ये काय आहे हे आम्ही आखो देखी याची देही याची डोळा असा आम्ही बघितलेला आहे तो रिपोर्ट कुठे बघितलेला आहे बघा की हे बघा हा आहे एसएनपी ग्लोबल फ्लॅश युएस पीएमआय आता मी तुम्हाला सांगते असा हा एकदम सोपा करून सांगणार आहे जवळ जवळ पाच पाणी पीडीएफ आहे अखंड आता आपण वाचत बसायची नाही त्यातली महत्त्वाच्या गोष्टी मी सांगायला आहेच आहे कधी रिपोर्ट आलेला आहे हा 21 फेब्रुवारी 2025 म्हणजे शुक्रवारी रिपोर्ट आलेला आहे आता तुम्ही म्हणाल हे फ्लॅश युएस पीएमआय बापरे म्हणजे नक्की काय युएस ग्लोबल एसएनपी ग्लोबल इतर संस्था यांनी रिपोर्ट दिला हे तर कळालं हे पीएमआय चा रिपोर्ट दिला म्हणजे काय पीएमआय म्हणजे परचेस मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थोडक्यात जी काही एक मॅन्युफॅक्चरिंगची म्हणजे उत्पादनाची आणि सर्विसेस ओके सर्विस आणि उत्पादन या दोघांचं मिळून ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी वाढते का उत्पादन जास्ती होते का नाही का कमी होतंय सर्विसेस ज्या दिल्या जातात ते सर्विसला काय म्हणतात मराठीमध्ये तोही नाही कट नको करू विचार तुला आठवलं तर मध्येच सांग मला कळतंय सर्विस देणे ते वाढतंय का कमी होते हे सांगणारा आकडा असतो पीएमआय चा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची पीएमआय 50 च्या वरती असेल तर वाढ होते आणि पीएमआय 50 च्या खालती असेल तर डीग्रोथ म्हणतो आपण त्याला वाढ होत नाहीये तिथले स्टॅग्नेट झालेले अडकून राहिली तिथले ते सो आता आपण काय बघणार आहोत की या रिपोर्ट मध्ये पीएमआय बद्दल काय सांगितलंय युएस पीएमआय भारतीय पीएमआय नाहीये अमेरिकेत ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्विसेस मध्ये वाढ होते का नाही हे कसं कळणार तू काय शोधलं का रे सेवा सेवा तुझ्या चेहऱ्यावरूनच मला कळालं होतं की काहीतरी नवीन शोध लागलेला आहे सो उत्पादन आणि सेवा याच्यात वाढ होते का कमी होते याच्याबद्दल आता आपल्याला कळणार आहे इथपर्यंत ओके अमेरिकेतलं हे ही कळालं तुम्ही म्हणाला आपण अमेरिकेतला आपण काय बघतोय अहो असणार आहे इम्पॅक्ट असणार आहे पुढे कळेल तुम्हाला थोड्या वेळात आता हा फ्लॅश हा शब्द काय आलाय फ्लॅश म्हणजे ते काय करतात तुम्हाला खालती आल्यावर सांगते सगळं शिकून घ्यायचंय आज आपल्याला इथे जर तुम्ही खालती आला रिपोर्ट मध्ये तर तुम्हाला दिसेल की फ्लॅश म्हणजे चला फ्लॅशच्या आधी तुम्हाला हे सांगते एसएनपी ग्लोबल ने हा रिपोर्ट आणला तरी कसा कुठून कुठून डेटा कलेक्ट कुठून केलेला आहे तर 650 उत्पादन करणारे कंपन्या आणि 500 सेवा देणाऱ्या कंपन्या या सगळ्यांकडनं त्यांनी क्वेश्चन भरून घेतलेली आहे ओके भरपूर प्रश्न विचारले प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितली हा सगळा जो डेटा आला त्याच्यातनं हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे सर्व उत्तरांचं विश्लेषण केलंय का तर नाही साधारण 80 ते 90% रिस्पॉन्सेस विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यावरनं हा डेटा प्रेझेंट केलेला आहे म्हणून याला म्हणायचं फ्लॅश डेटा ओके मग तुम्ही म्हणाल पूर्ण केलं तर तो फायनल डेटा झाला मग तुम्ही म्हणाल फ्लॅश डेटा आला फायनल डेटा कधी येणार माहिती आहे सगळे प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला सगळ्यांची उत्तर आहेत इकडे फायनल फेब्रुवारी डेटा पब्लिश विल बी पब्लिश ऑन 3 मार्च सो 3 मार्चला डेटा येणार आहे आणि पाच 3 मार्चला मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे एकदा सांगते शेवट शेवटच्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन आणि सर्विसेस सेवा हं सो 5 मार्चला सर्विसेस आणि कॉम्पोजिट इंडिकेटर कॉम्पोजिट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस कॉम्पोजिट एकत्र मिळून कॉम्पोजिट झाला हा सगळा डेटा येणार आहे 3 मार्चला आणि पाच मार्चला आता तुम्ही म्हणाल ठीक आहे फ्लॅश रिपोर्ट मध्ये असं घडलं तरी काय जेणेकरून सगळं असं सगळे म्हणले बेकार बेकार व्हायला लागले सो काय झालंय बघा याचा जो सेवा युएस सर्विस जो आहे हा 529 वरनं 497 ला आला तुम्हाला काय सांगितलं 50 च्या खालती म्हणजे खराब आणि आलाय किती 497 तुम्ही म्हणाल तेवढा पॉईंट तीन जरा करून घ्या ना ऍडजस्ट असं नसतं तर 50 च्या खालती आला म्हणजे पॉईंट वन ने जरी खालती आला तरी पण वाईटच मानणार ते आणि हा 25 मंथ लोला आहे थोडक्यात घडतंय काय कमी सर्विसेस रेंडर होत आहेत सो ही चांगली गोष्ट नाही अमेरिकन इकॉनॉमी साठी कारण त्यांच्या जीडीपीच्या जवळ जवळ 70 ते 80% फक्त सर्विसेस मधनंच येतं आता तुम्ही जर बघितलं उत्पादन उत्पादन तर 538 वर आहे हा 50 पेक्षा खूप जास्ती आहे आणि 518 वरनं 538 वर गेलेलं आहे काय वाईट आहे आपण बघा ना प्रॉब्लेम आहे सर्विस आणि मॅन्युफॅक्चरिंग एकत्र जर पकडलं तुम्ही कॉम्पोजिट पकडलं तर तोही 52.7 वरनं 504 वर आलेला आहे जो 17 मंथ लोला आहे सो हे चांगल्या गोष्टी घडतायत का तर नाही ह्याच सगळ्या डेटाचं इथं तुम्हाला असं छान गिरवून दाखवलंय मी सो इथं तुम्हाला दिसेल सर्विसेस खालती चालल्यात कॉम्पोजिट खालती चालले फक्त तो बिचारा एक मॅन्युफॅक्चरिंग वरती पण त्याचं काही कौतुक नाही कारण कॉम्पोजिट खालती चाललंय ना कॉम्पोजिट मध्ये दोघांचं मिळून जे वेटेज आहे ते खालतीच गेलेलं आहे शेवटी सो प्रॉब्लेम इथे आपल्याला थोडा दिसतो आहे आता काय होईल बघा कमी उत्पादन कमी सेवा रेंडर करणं देणं याने काय होणार आहे विक्रीचा आकडाच कमी येऊ शकतो त्यांचा जानेवारी ते मार्च हा जो आकडा असेल तो विक्रीचा आकडा कमी येऊ शकतो त्याच्यात अजून सो ह्याला म्हणायचं स्टॅग्नेशन ओके कमी येणे किंवा तिथल्या तिथे राहणे ह्याला आपण इंग्लिश मध्ये स्टॅग्नेशन म्हणतो आता नुसतं स्टॅग्नेशन होतंय का का याच्याबरोबर इन्फ्लेशन म्हणजे महागाई पण वाढते का तर महागाई पण वाढते ते आपल्याला कसं दिसेल इथे तुम्हाला थोडसं झूम करून दाखवते जरा जास्त झूम झालं वाटतं एकच मिनिटं हे बघा आता तुम्हाला काय दिसतंय मॅन्युफॅक्चरिंग इनपुट प्राइसेस हा एक असा निळा रंग आहे बघा हा इकडनं असं इनक्रीज झालं थोडं फ्लॅट परत इनक्रीज झालं मॅन्युफॅक्चरिंग इनपुट प्राइसेस खूप वाढतायत मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट प्राइसेस येल्लो हा काय एवढा नाही वाढत आहे म्हणजे काय होणार आहे बघा माझा कच्चा जो मला मिळणार आहे तो महाग मिळणार आहे आणि मी जे विक्री करू शकते त्याचे मला भाव वाढवता येत नाहीयेत कारण लोक घेणारच नाहीत समोरनं म्हणून माझे जे प्रॉफिट होणार आहेत ते प्रॉफिट कमी होऊ शकतील ओके सो इथं प्रॉब्लेम हा येऊ शकणार आहे त्यांच्या प्रॉफिट मार्जिन सुद्धा कमी होऊ शकतील सर्विसेसच्या बाबतीत काय झालंय सर्विस इनपुट प्राईसेस सर्विस इनपुट प्राईसेस पर्पल लाईन बघा इकडे आता शेवटी शेवटी वाढायला लागली आहे बघा आणि सर्विसेस प्राईसेस चार्ज अरे त्या तर मात्र कमी होतात सो ऑल इन ऑल अमेरिकेतही हा प्रॉब्लेम येतोय एक म्हणजे स्टॅग्नेशन चालू आहे त्यात इन्फ्लेशन ही थोडं वाढत चाललेलं आहे ह्याला आपण इंग्रजीमध्ये स्टॅग्फलेशन असं म्हणतो एवढं इकॉनॉमिक्स एकदम नाही झेपलं तरी चालेल ओव्हरऑल चित्रांवर कळलं ना काय चालू आहे या सगळ्यामुळे आता अमेरिकेत झाली गडबड फ्रायडेला कोसळलं अमेरिका बाजार आणि आपल्याकडे आज त्याचे पडसाद उमटले आणि आज सोमवारी भारतीय शेअर बाजार सुद्धा जवळ जवळ 200 पेक्षा जास्ती अंकांनी खालती आले ओव्हरऑल जर तुम्ही इकडे बघितलं ना तर याच्यात त्यांनी एक समरी दिली आहे बघा बऱ्याच गोष्टी आहेत गव्हर्मेंट पॉलिसीज बदलतायत त्यांच्या स्पेंडिंग कट्स करतात ते टॅरिफ म्हणून तुम्ही ऐकलं असेल ते पण मी तुम्हाला सांगेन जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट अशा अनेक गोष्टींमुळे अमेरिकेचं सेंटीमेंट बिघडलं आशावादावरनं निराशावादकडे गेलेले आहेत ते आणि असं घडल्यामुळे तिकडे काही शिंकली माशी की आपल्याकडे पण काही ना काहीतरी होणारच आहे सो आत्ता अमेरिकेत हा निराशावाद कुठे ना कुठेतरी आल्यामुळे आज भारतीय आवाज खालती गेली आत्ता पण बघितलं की अमेरिकेत कसा ओव्हरऑल एक निराशावाद जो काय म्हणतो तो आता आलेला आहे मी पण तेवढीच निराश झालेली आहे का माहिती आहे तुम्हाला हे काय अहो किती वेळ सांगायचं अजूनही लोक सबस्क्राईबच नाही करत अहो फुकट असतं सबस्क्राईब करून टाका ते बेल आयकॉन पण हाणा इतकं छान आता आपण तर नुसतंच शेअर बाजार नव्हे आता तर आपण इकॉनॉमिक्स वगैरे अर्थशास्त्र वगैरे शिकायला लागलोय हो आणि फक्त भारताचं नाही आता आपण अमेरिकेतल्या घडामोडी पण शिकायला लागलेलो आहे खरंच मराठी भाषेतनं सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा माझा अगदी मनापासून प्रयत्न आहे जेवढे जास्ती लोकं सबस्क्राईब करतात जेवढे जास्ती व्ह्यूज येतात तेवढं मलाही चांगलं वाटतं की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते सो तुम्ही ते सबस्क्राईब जर ऑलरेडी केलं असेल तर निध्यान तीन चार ग्रुपमध्ये आपला हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल ओके वळूयात इतर कारणांकडे कारण आता आपण काय म्हणलो आज बाजार आज भारतीय बाजार जवळ जवळ 250 पॉईंटनी खालती पडलं जवळ जवळ 1% नी खालती पडलं तर एवढं एकच कारण आहे का बाकी पण काही अजून प्रॉब्लेम्स आहेत तर नक्कीच आहेत बाकी काय काय प्रॉब्लेम्स आहेत तर आत्ता तुम्ही कदाचित ट्रम्पचे रेसिप्रोकल टॅरिफ हे जर तुम्ही वाचलं असेल हे रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय ते जेव्हा आपण काही वस्तू आयात करतो त्याच्यावरती आपण टॅक्स लावतो किंवा ड्युटी लावतो हा करेक्ट वर्ड आहे ओके ड्युटी कस्टम ड्युटी वगैरे तुम्ही कदाचित ऐकलं असेल ह्याला आपण टेरिफ पण म्हणू शकतो ओके तर ट्रम्प तात्यांनी काय सांगितलंय तुम्ही आम्हाला जर तुम्ही जर आमच्या प्रॉडक्ट वरती टॅरिफ लावलं तर आम्ही पण तुमच्यावर तेवढंच टॅरिफ लावणार आपण इंग्रजी टिट फॉर टॅट म्हणतो मराठीत आपण जशास तसे म्हणतो हं ट्रम्प काय म्हणलेत की जर भारताने अमेरिकन गुड्स वरती 50% ड्युटी लावली तर आम्ही पण भारतीय गुड्स वरती 50% ड्युटी लावणार ओके ह्याला म्हणायचं जशास तसे म्हणजे थोडक्यात भारतात टेस्ला कार जर आयात करायची असेल तर आपलं सरकार उदाहरण म्हणून सांगते आपलं सरकार म्हणते 50% ड्युटी लावा त्यांना 50% टॅरिफ लावा त्यांना आता ट्रम्प काय म्हणतात आमच्याकडे अच्छा असं मग आमच्याकडे जेव्हा तुमची टाटा मोटरची एखादी कार येणार असेल 50% आम्ही पण लावणार येतंय का लक्षात आपल्यासाठी ही काय एवढी चांगली गोष्ट पकडली जाणार नाही असा अंदाज आहे एक सिटीने एक रिसर्च रिपोर्ट दिलाय त्याच्यात त्यांनी सांगितलंय की याचा आपल्याला जवळ जवळ सात बिलियन डॉलर एवढा फटका पडू शकतो आणि हे अजूनही टॅरिफ लावायला सुरुवात केलेली नाही हे एप्रिल पासून लागू होणार आहेत सो जेव्हा लागू होतील तेव्हाच कळेल की खरा फटका नक्की किती पडतोय ओके हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की ओके रेसिप्रोकल टॅरिफ आहेत पण चायना जो आपला एक खास जो आपल्याला कायमच त्रास देत असतो तो अजूनही त्रास देतोच आहे का कारण जे एफआयआय आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते म्हणतात आता की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच आहेत आता तर आपण काय करूयात भारतातनं पैसे बाहेर काढून चायनामध्ये आपण पैसे टाकूयात या सगळ्या गमतीजमतीमध्ये आत्ता भारतीय स्टॉक मार्केटचं मार्केट कॅपिटलायझेशन ऑक्टोबर ते आता फेब्रुवारी पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स नी कमी झालेलं आहे आणि हेच त्याच कालावधीमध्ये चायनाचं मार्केट कॅपिटलायझेशन दोन ट्रिलियननी 2 ट्रिलियन डॉलर्स नी वरती गेलेलं आहे या सगळ्या याच्यात बऱ्याच जे अनालिस्ट आहेत ते म्हणतात कदाचित ही कदाचित ही जी आता सेंटीमेंट आहे सेल इंडिया बाय चायना म्हणजे काय भारतीय शेअर मार्केटमध्ये जेवढे केवढे स्टॉक्स आहेत ते सगळे जेवढे तुमच्याकडे आहेत त्यातले बरेचसे सगळे नाही म्हणतात त्यातले किंवा बरेचसे पण नको म्हणायला त्यातले काही शेअर्स विका आणि मिळालेला पैसा चायनीज मार्केटमध्ये लावा आता या सगळ्यामुळे माहिती आहे का आपलं ओव्हरऑल इंडियाचं जे अलोकेशन आहे एफआयएस ते आता दोन वर्षाच्या निचांकावरती आहे आता बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत आपण म्हणू शकता हे सगळा प्रॉब्लेम चालू आहे प्रॉब्लेम चालू आहे दुसरा दृष्टिकोन असा असू शकतो किंवा ऑलरेडी दोन वर्षाच्या लो वरती आहोत आपण अजून जाऊन जाऊन किती खालती जाणार असं म्हणतात ना मरे हुए को क्या मारना तो ऑलरेडी बिचारा अर्ध मेला झालेला आहे अजून किती मारायचं त्याला तसंच हे आहे ऑलरेडी मार्केट एवढं अर्धा मेला झालेला आहे अजून कशाला अजून किती खालती जाईल हा पण एक मुद्दा असू शकतो पण एफआयआय मात्र थांबवत नाहीयेत विकणं हे ही तेवढंच खरं आहे मी हे का म्हणते माहिती आहे 2025 मध्ये भारतातनं जवळजवळ एक लाख करोड एवढ्याचे शेअर्स विकून एक लाख करोड भारतात बाहेर नेलेला आहे पैसा आता त्यातलं काही मी म्हणलं असं काही चायनामध्ये गेलेला आहे आणि काही तर ते मायदेशी परत नेतात ओके आता तुम्ही म्हणाला असं पण झालं का एफआय ने सेल करून मायदेशी नेला त्यांच्या बॉन्ड्स मध्ये पैसे घातलं आम्हाला नव्हतं माहिती परत तुम्ही ते मगाशी म्हटलं ते सबस्क्राईब नाही बेल नाहीतर हा व्हिडिओ दिलाय की आपल्या चॅनलवर साठी किती जणांनी जवळ जवळ दोन-तीन लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे ज्यांनी ज्यांनी ते सबस्क्रिप्शन करून बेल आयकॉन प्रेस केलं त्यांना हे ऑलरेडी माहिती आहे सो मी म्हटलं तसं तीन प्रॉब्लेम्स मी तुम्हाला आता सांगितले पहिला तर तो झालाच आपला प्रॉब्लेम डिस्कस करून कुठला की ज्याच्यात मी तो रिपोर्टच दाखवला आत्ता दुसरा प्रॉब्लेम मी काय सांगितला ट्रम्प टॅरिफ रेसिप्रोकल टॅरिफ तिसरा मुद्दा मी सांगितला की चायना कसं आत्ता आपल्यापेक्षा चायनीज मार्केट्सला कसं जास्ती फेवर केलं जातंय आणि एफआयएस म्हणून सेलच करत राहतंय शेवटच्या भागात म्हणजे शेवटच्या व्हिडिओच्या भागामध्ये टप्प्यामध्ये मी तुम्हाला निफ्टी अजून काय पद्धतीने कुठपर्यंत पडू शकतं हे सुद्धा सांगणार आहे सो मी आता आलेली आहे ट्रेडिंग वरती हे बघा हे कसं चालू आहे मार्केट इथे होतं ऑल टाईम हाय इकडनं इथे खालती गेलं थोडा पुलबॅक आला परत खालती गेलो परत पुलबॅक आला आणि आत्ता आपण साधारण इथे आहोत ओके किती कितीने मार्केट पडलंय बघा साधारण या टॉप पासन या बॉटम पॉईंट पर्यंत साधारण 11 साडे अकरा पडलं सेकंड फॉल मध्ये इथपासन इथे म्हणजे ऑलरेडी 8% जवळ जवळ पडलं असं म्हणतात आयडियली तिसरा त्यातल्या त्यात छोटा असतो तर आत्तापर्यंत हा किती फॉल झालेला आहे आपण बघू इथपासन इथपर्यंत म्हणजे जवळ जवळ पाच टक्क्यांचा फॉल ऑलरेडी झालेला आहे पण आपण तुम्हाला आठवत असेल तर म्हणलेलो आहे अनेक वेळेला 21800 ही मला वाटते खूप एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 21800 जर आपण म्हणलो तर साधारण एक आठ टक्क्यांचा टोटल फॉल होऊ शकतो आठ पैकी पाच टक्क्यांचा फॉल ऑलरेडी होऊन गेलेला आहे सो मी अनेक वेळेला हे म्हणलेले की मला नाही वाटत की इथून पुढे अजून खूप खराब होईल मार्केट 3 4% अजून मॅक्सिमम असं मला या आता जेवढं जेवढं आपल्याला माहिती आहे त्याच्यावरनं असं वाटतंय की 3% अजून मॅक्सिमम असेल हे आत्ता जे चालू आहे करेक्शन मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ जिकडनं सुरुवात केलं होतं परत त्याची आठवण करून देते की जरी आपण रेकॉर्ड करूत की 28 महिन्यात 28 वर्षांमध्ये असं होईल की पाच महिने बॅक टू बॅक आपण लाल मध्ये क्लोजिंग दिलेली आहे तरी पण परसेंटेज फॉल हा कमी आहे जेव्हा पूर्वी एवढे मोठे फॉल झाले होते तेव्हा 25% 30% एवढा फॉल झाला होता आत्ताचे आपण 14% फॉलोवर आहोत आणि मी म्हणते असा 18% पेक्षा जास्ती फॉल होईल असं मला आत्ता वाटत नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी म्हटलं तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका माझा अगदी मनापासून प्रयत्न असतो आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजार असेल किंवा पर्सनल फायनान्स म्हणजे आर्थिक व्यवस्थापन असेल आणि आता जरा अर्थशास्त्र सुद्धा सोप्या भाषेत शिकवायचं हे माझे एक मनापासून प्रयत्न आहे सो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार

Robot Trading In FX Market

1)MT45378936 password: Drp12345 Server-EGlobalTrade-Cent6, 2) MT4 ID 3236020 , Server EGlobalTrade-Cent2, Investor Password- Drp@12345 3)MT4 ID 3334506 Server-EGlobalTrade-Cent4 Investor Password- Drp12345 4)MT4 ID 30098701 Server -EGlobalTrade-Cent5- Investor Password-vjFxReXg Check This A/c Performance Forex Account Management Service Available. This system is very Secured Trading System, Robot Run Any Currency for Forex Market. Below Joint Link https://account2.forex4you.com/en/user-registration/?raffid=rf:9lEBm7X

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post

Contact Form